Lonavala : पोर्टर चाळीतील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

Corona-infected woman dies in Porter's chawl

एमपीसीन्युज : लोणावळा येथील पोर्टर चाळीत राहणार्‍या कोरोना बाधित महिलाचा आज, बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

पोर्टर चाळ या रेल्वे काॅलनीमध्ये राहणार्‍या एका 57 वर्षीय महिलेला 24 जून रोजी श्वसनास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तळेगाव जनरल हाॅस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले होते.

26 जून रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.

या महिला रुग्णास अगोदरपासूनच यकृताचा आजार होता. त्यांच्या घरातील सात जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यांचे सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने आज या कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला.

या आधी वलवण गावातील एका महिलेचा मागील आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पोर्टर चाळीतील महिलेचा मृत्यू झाल्याने लोणावळ्यात कोरोनाच्या दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.