Lonavala : नांगरगावातील ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

Corona Positive, a senior citizen of Nangargaon :नांगरगावातील ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : नांगरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. या रुग्णाला अन्य गंभीर आजार आहेत.

नांगरगाव येथे राहणारी वृद्ध व्यक्ती ही निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. त्यांना मधुमेह, हायपरटेंशन व हदयविकार विकाराचे आजार आहेत. त्यांना त्रास होऊ लागल्याने 1 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज त्याचा कोरोना तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

त्यामुळे त्यांच्या जवळच्या संपर्कातील चार जणांना स्वॅब घेण्यासाठी तळेगाव येथील सुगी पश्चात केंद्रात पाठविण्यात आले आहे. नांगरगावात रुग्ण सापडल्याने ते रहात असलेल्या परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे. तसेच त्या व्यक्तीचा परिसर बफर झोनमध्ये घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

लोणावळ्यात आज अखेर खंडाळा, वलवण, पोर्टर चाळ व नांगरगाव या चार भागात पाच कोरोना रुग्ण मिळून आले असून यापैकी वलवण व पोर्टर चाळ येथील दोन रुग्णांचा  मृत्यू झाला व खंडाळा येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like