Lonavala : नांगरगावात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Corona positive patient for the second day in a row in Nangargaon : नांगरगावात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील नांगरगाव विभागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा करोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. शुक्रवारी याच विभागातील एक 60 वर्षीय पुरुषाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

या महिलेला गुरुवारी ( दि.2) खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कामशेत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी ( दि. 3) या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता.

_MPC_DIR_MPU_II

आज, शनिवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाबाधित महिलेवर कामशेत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला आधीपासूनच मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असा आजार आहे.

या महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण 18 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यातील पाच जणांचे स्वॅब आज घेण्यात आले आहेत. उर्वरित 13  जणांचे स्वॅब उद्या घेण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1