Lonavala Corona Update : शहरात आज 41 नवीन रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 726

0

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात आज, सोमवारी विविध विभागात कोरोनाचे 41 नवीन रुग्ण मिळून आले. लोणावळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. आज अखेर शहरात कोरोनाचे एकूण 726 रुग्ण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भांगरवाडी विभागातील 10, तुंगार्ली विभागातील 6, गवळीवाडा विभागातील 5, नांगरगाव विभागातील 3, बाजारपेठ विभागातील 3, वलवण विभागातील 3, ‘जी’ वॉर्ड विभागातील 2 आणि पांगोळी, हुडको, अण्णाभाऊ साठे वसाहत, बारा बंगला, हनुमान टेकडी, खंडाळा, स्वराज्य नगर, खोंडगेवाडी, रायवूड, इंदिरानगर या 9 विभागात प्रत्येकी 1 अशा एकूण 41 जणांचा समावेश आहे.

आज अखेर लोणावळा शहरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 726 झाली आहे. यापैकी बरे झालेल्या 309 जणांना आतापर्यत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनामुळे आज अखेर 27 नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या सक्रिय कोरोना बधितांची संख्या 390 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.