Lonavala corona Update : शहरात आज कोरोनाचे 29 नवीन रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 650

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात आज, शनिवारी कोरोनाचे 29 नवीन रुग्ण मिळून आल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आज अखेर 650 झाली आहे. विशेष म्हणजे आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या 8 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय तुंगार्ली आणि नांगरगाव विभागात आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तुंगार्ली विभागातील 11, नांगरगाव विभागातील 10, खंडाळा विभागातील 3, वलवण विभागातील 2 तसेच भांगरवाडी, ठोंबरेवाडी आणि गवळीवाडा या तीन विभागातील प्रत्येकी 1 अशा एकूण 29 जणांचा समावेश आहे.

लोणावळ्यात आज अखेर कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 283, तर सक्रिय कोरोनाचे 342 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे शहरातील 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.