Lonavala Corona Update: लोणावळ्यात होमगार्डचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह

Lonavala Corona Update: Home Guard's Corona report positive in Lonavala रेल्वे कॉलनीतील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील कोरोना बाधित पोलिसाच्या संपर्कात आलेल्या एका होमगार्डचा कोरोना चाचणी अहवाल आज रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. तर पोर्टर चाळ रेल्वे कॉलनीमधील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व संशयितांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहे.

तालुका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे सदर पोलिसाच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच जणांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी एका होमगार्डला लक्षण दिसू लागल्याने त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज रविवारी सकाळी त्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला असून तो त्यात पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

सदर होमगार्ड हा डोंगरगाववाडी लोणावळा येथील रहिवासी असून कोविड केअर सेंटर, तळेगाव दाभाडे याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता डोंगरगाववाडीत देखील कंटेन्मेंट झोन करण्यात येणार आहे.

दुसरीकडे शुक्रवारी लोणावळा शहरातील पोर्टर चाळ, रेल्वे कॉलनीमधील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळून आली होती. सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व सातही व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. मात्र खबरदारी म्हणून या सर्वांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आता लवकरच लोणावळ्यात देखील कोव्हिड केअर सेंटर सुरु होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.