Lonavala Corona Update: लोणावळा शहरात आज कोरोनाचे सात रुग्ण सापडले

Lonavala Corona Update: Seven corona patients were found in Lonavala today लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या 61 झाली आहे.

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात आज (दि.30) कोरोनाचे तब्बल सात रुग्ण मिळाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात सात दिवसाच्या लॉकडाऊन काळात रुग्ण संख्या घटली होती. आता बाजारपेठा पूर्ववत होताच रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे.

बुधवारी लोणावळा येथील कोविड केअर सेंटरमधून सोळा जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह व अकरा जणांचे निगेटिव्ह आले आहेत. यासह तळेगाव येथे तपासणी करण्यात आलेल्या दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये गवळीवाडा विभागातील दोन जण, भांगरवाडी येथील दोन जण, आगवालाचाळ येथे पूर्वी अहवाल पाॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कातील दोन जण व तुंगार्ली गावात एक जण या सात जणांचा समावेश आहे. लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या 61 झाली आहे.

लोणावळा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.

शहरातील वयस्कर व पूर्वीपासून काही आजार असणारे नागरिक यांची तपासणी मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यासह सर्व व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या दुकानातील मालक व कामगार यांची अँन्टी बॉडी टेस्ट करून घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

यासह शहरातील नागरिकांची अँन्टी बॉडी टेस्ट करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी टेस्ट किट देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.