Lonavala Corona Update: लोणावळ्यातील ‘त्या’ तिघांचे अहवाल निगेटिव्ह

Lonavala Corona Update: The reports of 'those' three in Lonavala are negative दहा दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर 12 जूनला रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचाराकरिता वायसीएममध्ये पाठविण्यात आले होते.

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे मृत पावलेल्या वलवण गावातील महिलेची दोन्ही मुले व तिचा पती यांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

मंगळवारी दुपारी वलवण गावातील एका महिलेचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दि. 2 जून रोजी ही महिला पतीसोबत गोव्याहून लोणावळ्यात आली होती.

दहा दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर 12 जूनला रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचाराकरिता वायसीएममध्ये पाठविण्यात आले होते.

कर्करोगाच्या रुग्ण असलेल्या या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कातील पती व दोन मुले हे हायरिस्क मध्ये आल्याने त्यांची बुधवारी कोरोना तपासणी करण्यात आली होती.

आज सकाळी त्यांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वलवण येथिल त्यांच्या घर परिसरातील लो रिस्क मधील 37 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.