Lonavala : लायन्स व रोटरी क्लबकडून कोरोना योद्धयांचा सन्मान

Corona Warriors honored by Lions and Rotary Club

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या काळात पहिल्या दिवसापासून लोणावळा शहराला सुरक्षित ठेवण्याकरिता दिवसरात्र काम करणारे लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डाॅक्टर यांचा लायन्स क्लब लोणावळा व रोटरी क्लब लोणावळा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्यासह डाॅ. भगवान खाडे, नगरपरिषद रुग्णालयातील डाॅ. आर.व्ही. जगताप, डाॅ. वर्षा सुर्यवंशी, डाॅ. विश्वंभर सोनवणे, डाॅ. सौरभ गरडे, डाॅ. डाॅली आगरवाल, राजेंद्र आगरवाल, दिलीप ठोेंबरे यांच्यासह परिचारिका, सिस्टर, हेल्पर, रुग्णवाहिकेचा वाहनचालक या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला.

लायन्स क्लबच्या कार्यक्रमाला अध्यक्ष शिव अगरवाल, लायन विकास नय्यर, जितेंद्र सुराणा, नविन भुरट, विजया खंडेलवाल, जेबीसिंग बक्षी, किशोर पवार, गिरिष पारख हे उपस्थित होते.

रोटरी क्लबच्या वतीने लोणावळ्यातील डाॅक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष राजेश गायकवाड, विकास तारे, रविंद्र कुलकर्णी, धिरजलाल टेलर, खेमसिंग चौहान, जयवंत नलोडे, नितिन कल्याण, मुस्तफा काॅन्ट्राक्टर, शाम पवार, आशिष मेहता हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.