Lonavala : लोणावळ्यातील डाॅक्टरला कोरोनाची लागण

Coronavirus infection in Lonavla doctor

एमपीसी न्यूज – येथील एका डाॅक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. 40 वर्षीय वयाचे हे डाॅक्टर कामशेत येथील एका कोरोना पाॅझिटिव्ह डाॅक्टरच्या संपर्कात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार वर्धमान सोसायटी येथील एका रुग्णालयातील डाॅक्टर कामशेत येथील एका डाॅक्टर‍ांच्या संपर्कात आले होते. कामशेत येथील डाॅक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने लोणावळ्यातील सदर डाॅक्टरांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले होते.त्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांनी शंका आल्याने स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली असता, त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

लोणावळा नगरपरिषदेकडून कल्पतरू रुग्णालयाचा परिसर सॅनिटाईझ करून घेण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालय बंद ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.