Lonavala Crime : वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या 602 चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; 18 जणांवर गुन्हे दाखल 

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर व ग्रामीण भागात पर्यटनबंदी असताना देखील शासकीय नियमांचे उल्लंघन करत लोणावळा ग्रामीण परिसरात आलेल्या 602 वाहन चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शनिवार व रविवार या दोन दिवसात दंडात्मक कारवाई केली.

तर लाॅकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली.

पुणे जिल्हा व मावळ तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी पुणे जिल्हाधिकारी यांनी लोणावळा व मावळ परिसरात पर्यटनबंदीचा आदेश लागू केला आहे. मागील चार महिन्यांपासून याबाबत जागृती केली जात असताना देखील मुंबई पुण्यातील हौशी पर्यटक शनिवार व रविवारी लोणावळा व मावळ परिसरात पर्यटनासाठी गर्दी करतात.

यामध्ये अनेक जण मास्क परिधान न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार करत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.