Lonavala Crime News : मोक्कातील फरार आरोपीला वेश्याव्यावसाय करताना अटक; पाच पीडित मुलींची सुटका

एमपीसी न्यूज – पुण्यातील मोक्कातील फरार आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी कार्ला परिसरातील एका बंगल्यात वेश्या व्यावसाय चालविताना ताब्यात घेत अटक केली. सदर ठिकाणाहून पाच मुलीची सुटका करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.

विठ्ठल महादेव शेलार (वय 32 रा. हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. तो पुण्यातील मोक्कामधील फरार आरोपी असून त्यांच्यावर पुणे परिसरात खुनासह विविध गुन्हे दाखल असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, मौजे कार्ला गावचे हद्दीत बेंद्रेज हॉलिडे होम मधील अनिरुद्ध गांधी यांचे बंगल्यामध्ये काही इसम वेश्या व्यवसायाचा धंदा करत आहेत.

या बातमीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलिस हवालदार शकील शेख, कुतुब खान, पोलीस नाईक मयुर अबनावे, महिला पोलीस शिपाई रुपाली कोहिनकर, आश्विनी लोखंडे, पोलीस शिपाई स्वप्निल पाटील, रहिस मुलाणी, संतोष वाडेकर, हनुमंत शिंदे, भुषण कुँवर, सुभाष शिंदे, अंकुश पवार, होमगार्ड शंकर खेंगरे, अनिकेत पाटील यांच्या पथकाने दोन पंच व डमी ग्राहक तयार करुन मौजे कार्ला गावचे हद्दीत बेंद्रेज हॉलिडे होम मधील अनिरुद्ध गांधी यांचे बंगल्यावर रात्री 8 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी पाच पीडित महिला व आरोपी विठ्ठल महादेव शेलार (वय 32 वर्षे रा. शिवतेजनगर, हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे), अशोक दादा खरात (वय 26 वर्षे रा. गुजरवाडी, कात्रज, पुणे), राजु दशरथ बहिरे (वय 30 वर्षे रा. अशिर्वाद कॉलनी, रहाटणी पुणे) व त्यांचा 44,32,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

अंधाराचा फायदा घेत त्यांचे तिन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर सदर पिडीतांना विश्वासात घेऊन ग्रामीण पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगीतले की, आरोपी विठ्ठल शेलार हा त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. सदर पाचही पिडीत महिलांना सुरक्षा गृह मुंढवा येथे ठेवण्यात आले असुन, आरोपींवर भारतीय दंड सहिता कलम 370 (1) 188, 269, 270 व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7 (1) (ब) तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक टि. वाय. मुजावर हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.