-MPC-TOP-MOST-BANNER-I

Lonavala Crime News : लोणावळ्याच्या तत्कालीन नगराध्यक्ष राजू चौधरी हत्या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेतील आरोपींची निर्दोष मुक्तता

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष मृत राजू चौधरी यांच्या हत्त्येप्रकरणी सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांची मुंबई उच्च न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

लोणावळा नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजू चौधरी यांची 26 मे 2009 रोजी दिवसाढवळ्या नगरपालिकेमध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये आरोपी सुमित गवळी व जफर शेख यांनी हत्या केल्याबाबत त्यांचे नाव आले होते. याप्रकरणी मुख्य तक्रारदार यांनी वरील आरोपींची नावे दिल्या कारणाने हे प्रकरण हे जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे येथे चालवण्यात आले होते.

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 27 एप्रिल 2012 मध्ये सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांना कलम 302, 34 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी अपील त्यांचे वकील ॲड. शैलेश धनंजय चव्हाण यांच्या मार्फत दाखल केले. या अपिलाची अंतिम सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती एन. एम. बोरकर यांच्या खंडपीठासमोर चालवण्यात आली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने 7 जून 2021 रोजी अंतिम निकाल दिला असून नगराध्यक्ष राजू चौधरी हत्या प्रकरणात सुमित प्रकाश गवळी व जफर शेख यांची पूर्ण पुरावे आणि साक्षिंची फेरतपासणी करून सहभाग असल्याचे सिद्ध होत नसल्याकारणाने निर्दोष मुक्तता केली.

हे आरोपी मागील 12 वर्षांपासून येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. तसेच या प्रकरणामध्ये निर्दोष आरोपी अमित प्रकाश गवळी व प्रकाश गवळी यांच्या विरोधात सरकार तर्फे सादर केलेले अपील देखील उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. आरोपी यांच्या वतीने ॲड. शैलेश धनंजय चव्हाण व ॲड. विशाल खटावकर यांनी काम पाहिले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn