Lonavala Crime News : कार चोरटा लोणावळा पोलिसांच्या सापळ्यात

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातून तवेरा गाडी चोरणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या क्विक रिस्पाँसमुळे सापळ्यात सापडला. अब्दुल रहेमान नाकेदार (वय 22,  रा. सोलापूर, हल्ली रा. क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण आनंदराव शिंदे (वय 45 वर्षे रा. भैरवनाथ नगर, कुसगाव ता. मावळ जि. पुणे) हे अपोलो गॅरेज जवळ त्यांच्या स्वतःची तवेरा कारचा (MH 14 FS 5085)टायर पंक्चर झाल्याने तो बदलून घेत होते. यावेळी त्यांनी गाडीची चावी स्वीचमध्ये तशीच ठेवली होती.

टायर बदली झाल्यानंतर ते दुकानात पैसे देण्यासाठी गेले असता तेवढ्या वेळात एका अज्ञात इसमाने गाडीमध्ये बसून गाडी चालू करून पुण्याच्या दिशेने पलायन केले.

याबाबत फिर्यादी शिंदे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला कळविले. सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या सुचनेनुसार लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस नाईक जितेंद्र दिक्षित, पोलीस नाईक जाधव, पोलीस काँन्स्टेबल गणेश होळकर, शरद जाधवर व पोलीस काँन्स्टेबल शिंदे यांनी वरसोली टोलनाका येथे सापळा लावत गाडीच्या नंबरवरून ही गाडी पकडली.

पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी तपास पथकासह गाडी चोरणार्‍या अब्दुलकडे चौकशी केली असता त्याने लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन चार चाकी वाहने, त्यामध्ये 1 तवेरा व 1 इको गाडी तसेच तीन टू व्हीलर त्यामध्ये एक युनिकाॅन, एक यामाहा व एक हाॅर्नेट अशी वाहने चोरून नेल्याचे कबूल केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.