Lonavala Crime News : लोणावळ्यात नगराध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या विषयी फेसबुक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी एक जणावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्ट करणारे धनंजय काळोखे (रा. ठोंबरेवाडी, लोणावळा) यांच्या विरोधात भादंवी कलम 354 (ड)(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.

लोणावळा शहरात मंगळवारी पार पडलेल्या बजाज विशेष लसीकरण मोहिमेनंतर भाजपा व राष्ट्रवादी पक्षांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर धनंजय काळोखे यांनी फेसबुक पेजवर नगराध्यक्षा जाधव यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. भाजपा महिला आघाडीने याविरोधात गुरुवारी आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तर नगराध्यक्षा जाधव यांनी गुरुवारी रात्री याबाबत फिर्याद दाखल केल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष शिंदे पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.