Lonavala Crime News : एक्सप्रेस वेवर वाहनचालकांना लुटणारी टोळी LCB च्या टीमकडून जेरबंद

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून (LCB) जेरबंद करण्यात आली आहे.

12 जुन रोजी कामशेत हद्दीतील ताजे पेट्रोल पंपावर मध्यरात्री 12.48 वाजण्याच्या सुमारास दुर्गाप्रसाद जगत कहर (वय 27 धंदा ड्रायव्हर रा.उत्तरप्रदेश) हे रस्त्याच्या बाजूला ट्रक मध्ये झोपलेले असताना चार अनोळखी इसमानी त्यांना मारहाण करून त्यांचे गाडीच्या कप्प्यामध्ये असणारी रक्कम 70,000 हजार रुपयांची रोकड जबदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जबरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे गुन्हे खालापूर येथील एक टोळी करीत असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाल्यानंतर खालापुर तालुक्यातील मोरबेवाडी चौक येथे सापळा लावत एलसीबी पथकाने गणेश हरिभाऊ वाघमारे (वय 28 रा. चौक मोरबेवाडी ता.खालापूर जि रायगड)व संतोष उर्फ मंगल्या वाघमारे (वय 21 रा. चौक मोरबेवाडी ता.खालापूर) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी कामशेत हद्दीत 2 व तळेगाव दाभाडे हद्दीत 3 असे एकूण 5 गुन्हे त्यांचे खालील साथीदार संतोष उर्फ मलिक मारुती हिलम (रा. रामवाडी ता.खालापूर जि.रायगड), रोहिदास जाधव (रा. वरोसे वाडी ता.खालापूर), राकेश वारे (रा. परळी ता.सुधागड जि.रायगड) केले असल्याचे सांगितले.

वरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, सुनील जावळे, काशीनाथ राजापूरे, पोलीस हवालदार मुकुंद अय्याचित, सचिन गायकवाड, प्रकाश वाघमारे, पोलीस काँन्स्टेबल बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.