Lonavala Crime News : सिगरेट बदलून न दिल्याच्या कारणावरुन मोरवे गावात हाणामारी

लोणावळा : सिगरेट बदलून न दिल्याच्या कारणावरून दुकानदाराच्या घरावर दगडफेक करत अंगणात उभी असलेल्या पिकअप गाडीच्या काचा फोडल्याप्रकरणी मोरवे गावातील 8 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी बबन घारे (वय 40, मोरवे गाव, पवनानगर) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (17 मार्च) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नितिन गाऊडसे हा शिवाजी घारे यांच्या दुकानावर सिगारेट घेण्यासाठी आला होता.

_MPC_DIR_MPU_II

घारे यांची मुलगी श्वेता हिने त्याला सिगारेट दिल्यानंतर ती घेताना तुटली, यावेळी सिगारेट बदलून दे असे त्याने सांगितले मात्र श्वेताने सिगारेट बदलून न दिल्याने आलेल्या रागातून त्याने तिथेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवाजी घारे व घरातील इतर सदस्य तसेच नागरिक जमा झाल्याने गाऊडसे तेथून निघून गेला.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सगळे झोपलेले असताना नितिन नामदेव गाऊडसे, तुषार माऊली गाऊडसे, सोन्या माऊली गाऊडसे, रुपेश आनंता गाऊडसे, निखिल नवनाथ गाऊडसे, अक्षय नंदू दळवी व इतर दोन तीन जणांनी घारे यांच्या अंगणात उभ्या असलेल्या पिकअप गाडी क्र. (MH 14 AZ 0048) हीच्यावर दगडफेक करत तीच्या काचा फोडल्या तसेच घरावर दगडफेक केली. यामध्ये शिवाजी घारे यांची पत्नी व आई यांना दगड लागला असल्याचे फिर्यादीमध्ये म्हंटले आहे.

याप्रकरणी वरील सर्वांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम 324, 338, 427, 143, 147, 149 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून पवनानगर बिटचे पोलीस नाईक जितेंद्र दिक्षित तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.