Lonavala Crime News : लोणावळ्यात शनिवारी एकाच रात्री चार घरफोड्या; 6 लाखांचा मुद्देमाल लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातील भांगरवाडी व हुडको काॅलनी परिसरात शनिवारी (दि. 20) रात्री ते रविवारी (दि. 21) पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत तब्बल 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तर पाचव्या ठिकाणी घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न झाला. एकाच रात्री ऐवढ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भांगरवाडी दामोदर काॅलनी येथील राजेश मुरलीधर काशिकर यांच्या प्लॅटमध्ये चोरी करत चोरट्यांनी सोन्याची चेन, सोन्याची अंगटी, चांदीचे दागिने असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल व 30 हजार रुपये रोख असा 60 हजारांचा ऐवज लंपास केला. दुसरी घरफोडी गोरख चौधरी यांच्या घरात झाली. त्यांच्या येथील एक सोन्याचा गंठण, सोन्याची अंगटी व दोन हजार रुपयर रोख असा 34 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

तिसरी घटना हुडको काॅलनी सह्याद्री नगर येथे घडली. यामध्ये विशाल वसंत दिघे यांच्या घरातील 2,10,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे 5 तोळ्याचे मंगळसूत्र, 84,000/- रूपये किंमतीचा सोन्याचा 2 तोळ्याचा नेकलेस, 84,000/- रुपये किंमतीची सोन्याची 2 तोळ्याची चेन, 32,000/- रूपये किंमतीचे चांदीचे गणपतीचे डोक्यावरील छत्री, 18,000/- रूपये किंमतीचा चांदीचा मुकुट, 30,000/- रूपये किंमतीचे इतर चांदीचे दागीने, व 40,000/- रूपये रोख असा 4 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चौथी घटना संध्या प्रभाकर भोस रा. हुडको काँलनी लोणावळा येथे घडली. त्यांच्या घरातील सोन्याचे कर्णफुले, चांदीचे दागिणे व पाच हजार रुपये रोख असा 18 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर पाचवी घटना अभिजीत गजानन चिणे यांचे घराचे लाँक तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.