Lonavala Crime News : लोणावळा ग्रामीण पोलिसांची 268 जणांवर कारवाई

पुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एमपीसीन्यूज : शनिवार व रविवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेत विना मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता फिरणार्‍या 268 जणांवर कारवाई करत 72 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

लोणावळा शहर व ग्रामीण भागात यावर्षी पर्यटनबंदी असताना देखील शनिवार व रविवार पर्यटकांची गर्दी होत आहे.

या दोन दिवसात लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरसोली टोलनाका, कार्ला फाटा, मळवली, कुसगाव, टायगर पाॅईट व पवनानगर येथे वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली.

पुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.