Lonavala Crime News : कुणेगाव सरकारी पड जमिन फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

एमपीसीन्यूज : बनावट कागदपत्राच्या आधारे कुणेनामा, लोणावळा येथील सरकारी पड जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न करत व्यावयासिकाची 7 कोटी 27 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी मुंबईतून दोन जणांना अटक केली. त्यांना वडगाव न्यायालयाने 26 आँक्टोबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी आतापर्यत चार जणांना अटक झाली आहे.

तुलसी परमानंद जसनानी व महेश अलिमचंदानी (दोघेही रा. खार, मुंबई) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. तर यापुर्वी किशोर गोपालदास ललवाणी व किशोर मंदीयानी या दोघांना अटक करण्यात आली होती.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणेनामा लोणावळा येथील गट नं. 98 ही 14.5 एकर ही शेतजमीन सरकारी पड असताना व इतर हक्कातून कमी झालेले कूळ मयत सोनू अनाजी लांडगे यांचे 18 ते 21 कूळवारस असल्याचे माहिती होते.

_MPC_DIR_MPU_II

असे असताना सुद्धा आरोपी महेश आलिमचंदानी व तुलशी जसनानी यांनी संबंधितांच्या मदतीने बनावट कागदपत्र तयार करत विनय चावला यांना नातेसंबंधाचा फायदा घेत फिर्यादी विनय चावला व त्यांचे वयोवृद्ध वडिल ताराचंद चावला यांना जमिन विकण्याचा प्रयत्न करत आर्थिक फसवणूक केली.

सन 2013 ते 2019 या कालावधीत 7 कोटी 27 लाख 50 हजार रुपये लाटण्यात आले असल्याचे चावला यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तुलसी जसनानी यांच्या घरी ठाण मांडत त्यांना व महेश अलिमचंदानी यांना अटक केली. दोन्ही आरोपींवर मुंबईत देखील फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.