Lonavala: ‘एक पाऊल माणुसकीच्या सेवेसाठी’ उपक्रमातून दररोज दोन हजार जेवणाच्या पाकिटांचे वाटप

हनीफ शेख व सुन्नी मुस्लिम समाजाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे आलेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात हातावर पोट असणारे गरीब व गरजू लोकांनाचे दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. कोणीही उपाशी राहू नये या हेतूने हनीफ हसन शेख व लोणावळा सुन्नी मुस्लिम जमात यांच्या वतीने 21 दिवसाच्या लाॅकडाऊन काळात दररोज दुपारी व संध्याकाळी मोफत व घरपोच अन्न पुरवठा केला जात आहे. दोन्ही वेळेस साधारण 1,500 ते 2,000 जेवणाच्या पाकिटांचे दररोज वाटप केले जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते जीशान हनीफ शेख, फरहान हनीफ शेख, शफी अत्तार, पटेल भाई, रफीक शेख, हाजी मुश्ताक, जमीर कादरी, राजू परदेशी, फिरोज सलाउद्दीन, अन्वर पायलट, समीर सय्यद, अलतमश तांबोळी, सोनू तांबोळी, शमीम सलमानी, जावेद खान, सलीम म्हाते, आसीफ पठाण, राजमोहम्मद शेख, अन्वर निम्बंरगी,शाहीद बशीर खान,जमीर सय्यद, रमिज़ अन्सारी, रेहान सय्यद, कदीर शेख, समिर खोले, गणेश परदेशी,सोहेल शेख, अरफात शेख हे कार्यकर्ते रात्रंदिवस परिश्रम घेत सदरचे वाटप करत आहेत.

लोणावळा शहर परिसरात झोपडपट्टीबहुल भाग जास्त आहे तसेच अनेक भागात गोरगरीब कुटुंब राहात असल्याने त्यांना दोन वेळचे जेवण देण्याचा प्रयत्न हनीफ शेख व सुन्नी मुस्लिम समाजाने सुरु केला आहे. वरसोली टोलनाक्यावरील पोलीस कर्मचारी तसेच शहरातील पोलीस यांना देखील जेवणाचे डबे पुरविले जात आहेत. अतिशय नियोजनबद्धरितीने व पोलिसांच्या सहकार्याने हे कार्य सुरू आहे.

लोणावळा सोशल फाऊंडेशनच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस व सीआरपीएफच्या पथकाला आरोग्यरक्षक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच सकाळचा नाष्टा देण्यात आला. तसेच गोरगरीबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. सोशल फाउंडेशनचे सदस्य व सुन्नी मुस्लिम जमातचे ट्रस्टी हाजी अब्बास खान, माजी नगरसेवक नासीर शेख, शिवसेना प्रणित हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना लोणावळा शहराध्यक्ष कमर अन्सारी, युवक काँग्रेसचे मावळ तालुका उपाध्यक्ष फिरोज बागवान, सामाजिक कार्यकर्ता जाकीर शेख हे यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.