Lonavala : भांगरवाडीत आढळला स्त्री अर्भकाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- भांगरवाडीत काॅक्रेट इंडियाकडे जाणार्‍या मार्गालगत नाल्यात एक स्त्री अर्भकाचा मृतदेह काळ्या रंगाच्या पिशवीत आढळून आला आहे. आज, मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

भांगरवाडीत रेल्वे बी केबिनच्या बाजुने काॅक्रिट इंडियाकडे जाण्याकरिता रस्ता आहे. या रस्त्याच्या जवळ एका नाल्यात काळ्या रंगाच्या पिशवीत लहान बाळाचा मृतदेह असल्याचा फोन त्या भागाचे नगरसेवक देविदास कडू यांना आला. कडू यांनी ही बाब लोणावळा शहर पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळाकडे जात सदर नवजात बालकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पाण्यात बराचकाळ मृतदेह असल्याने तो खराब झाला असून उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. मानवतेला काळीमा फासणारा हा प्रकार कोणी केला याचा शोध पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेबें करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.