Lonavala : क्रिकेट खेळताना एका खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – लोणावळ्यातील मध्य रेल्वेच्या क्रिकेट मैदानावर आगरी कोळी समाज बांधवांच्या वतीने सुरु असलेल्या हौशी क्रिकेट सामनादरम्यान खेळताना एका खेळाडूचा ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय-४६, रा. असोलेगाव, नालासोपारा, पालघर) असे क्रिकेट खेळताना ह्रदय विकाराने मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी (दि. ४) सकाळी लोणावळ्यातील रेल्वेच्या मैदानावर कोकणातील आगरी कोळी समाज बांधवांच्या वतीने हौशी क्रिकेटच्या मैत्रीपूर्व सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर पाटील हे आगरी कोळी समाज क्रिकेट संघ असोले यांच्या वतीने खेळत होते.

खेळताना ज्ञानेश्वर यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते मैदानावरच कोसळले. हे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे आगरी कोळी समाज बांधवांच्या हौशी सामन्यावर दुःखाचे सावट पसरले असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.