Lonavala : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘ड्युक्स नोज’च्या सुळक्यावर दीपोत्सव

एमपीसी न्यूज – सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच सुळका असलेल्या ‘ड्युक्स नोज’च्या शिखरावर सालाबादप्रमाणे यंदाही दीपोत्सव साजरा करण्यात आला. पौर्णिमेच्या रात्री लक्ष लक्ष दिव्यांनी ‘ड्युक्स नोज’चा सुळका उजाळून निघाला होता.

कुरवंड गावाच्या हद्दीत ‘ड्युक्स नोज’चा हा सुळका आहे. देवाधी देव इंद्र देवांनी याठिकाणी बारा वर्ष पापमोचन तपश्चर्या केली, त्यांच्या कमंडलूमधून पडलेल्या पाण्याने याठिकाणाहून नदीचा उगम झाला आहे. इंद्र देवांच्या नावावरुन ही नदीला इंद्रायणी हे नाव प्राप्त झाले आहे.

अशा या हजारो फुट उंच सुळक्यावरील पवित्र व स्वंयभू शिवलिंगावर लोणावळ्यातील हौशी गिर्यारोहकांच्या वतीने मागील आठ वर्षापासून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या पुर्व संध्येला दिवे लावण्याच्या समयी सुळक्यावरील स्वयंभू शिवलिंग, मंदिरातील शिवलिंग, नंदी यांची विधिवत पुजा करत व मंदिराच्या परिसरात मेणाचे दिवे लावत या मंडळींनी दीपोत्सव साजरा केला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गावोगावी देवतांची मंदिरे तसेच गावांमधील इतर मंदिरे व घरोघरी दिवे लावत रांगोळी काढत दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त विविध उपक्रम देखिल राबविले जातात. मात्र, सह्याद्रीच्या सुळक्यावरील दीपोत्सव हा अविस्मरीण सोहळा आहे. प्रत्येकाला पहावेसे वाटणारे हे ठिकाणी अतिशय उंचावर आहे. तसेच जाण्याकरिता रस्ता वा पायर्‍या नसल्याने कुरवंडे गावात वाहने उभी करत तिन डोंगरांची चढाई करुन या ठिकाणा पर्यत पोहचावे लागते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.