Lonavala : पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी दीपक मानकर

Deepak Mankar appointed as National Working President of Police Friends Association

एमपीसी न्यूज – पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी लोणावळ्यातील दीपक मानकर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी ही नियुक्ती केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेले दीपक मानकर यांचे पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय साधण्याच्या कामाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. यासह रायगड जिल्ह्यातील सुनिल पाटील यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील राजेंद्र लावंघरे यांना महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.