Lonavala : ऐतिहासिक खंडाळा तलावाला धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या खंडाळा तलावाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या अशी मागणी खंडाळा ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते डाॅ. किरण गायकवाड यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.

राज्य सरोवर संवर्धन योजनेमधून खंडाळा तलावाचे सुशोभिकरण करण्याचे काम नगरपरिषदेने सुरु केले आहे. लवकरच याठिकाणी बोटिंग प्रकल्प सुरु होणार आहे. सदरच्या तलावात 31 डिसेंबर 1779 साली श्रीमंत महादजी शिंदे व इंग्रज यांच्याच लढाई झाली होती. त्यावेळी इंग्रजांवर विजय मिळविलेला या तळ्यातील इतिहास प्रेरणादायक आहे. अशा या ऐतिहासिक भूमीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज याचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.