Lonavala : सरजु भवानी क्रिकेट सामन्यात देना बँक संघ विजयी

एमपीसी न्यूज- मध्य रेल्वेच्या वतीने लोणावळ्यातील रेल्वे गाउंडवर भरविण्यात आलेल्या 61 व्या सरजु भवानी क्रिकेट स्पर्धतील अंतिम सामन्यात मुंबईतील देना बँक संघाने उत्कृष्ट खेळ करत वीर भगतसिंग संघावर बारा धावांची आघाडी घेत विजय संपादित केला. या स्पर्धेतील मॅन आँफ द सिरिजचा किताब देना बँक संघातील मीहराज खान याला देण्यात आला.

रेल्वेचे दिवंगत क्रिकेटपटू सरजु भवानी यांच्या स्मरणार्थ मागील 61 वर्षापासून लोणावळ्यात मध्य रेल्वेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. सरजु भवानी क्रिकेट स्पर्धेत यावर्षी मुंबई, पुणे, कल्याण भागातील 16 संघ सहभागी झाले होते. यामधील अंतिम सामना देना बँक मुंबई व वीर भगतसिंग संघ लोणावळा यांच्यात झाला.

यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय देना बँक संघाने घेतला. 20 षटकात 180 धावा या संघाने केल्या. यामध्ये आकाश आनंद याच्या 64 व ओंकार जाधव याच्या 70 धावांचा समावेश होता. देना बँकेने रचलेल्या धावांचा डोंगर पार करताना वीर भगतसिंग संघ 168 धावा करु शकला. या स्पर्धेत देना बँक संघ 12 धावांनी विजयी झाला. स्पर्धेतील बेस्ट बाॅलर म्हणून सिद्धक सिंह, बेस्ट बॅटसमन गौरव तोमर, बेस्ट फिल्डर शुभम पांडे यांना सन्मानित करण्यात आले.

नॅशनल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष पी.जी.शिंदे यांच्या हस्ते विजयी संघाला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्युटचे सचिव मयूर पाडाळे, नगरसेवक निखिल कविश्वर, अँड आलीम शेख, शहाबुद्दिन शेख, प्रफुल्ल बारी, बी. आर.चौधरी, अशोक तिखे, मांडेकर, रामदास थरकुडे, शेखर शेळके, विशाल गुरव, संदीप विकारी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.