Lonavala: दोन दिवसात पगार न झाल्यास सोमवारपासून ‘देवदूत’ जाणार संपावर

Lonavala: 'Devdoot Team' warns of strike from Monday if salary is not paid in two days

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्‍या देवदूत कामगारांना कंपनीकडून एप्रिल महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. पगाराच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आर्यन कंपनीकडून दोन दिवसांत विचार न झाल्यास सोमवारपासून (18 मे) ‘देवदूत टीम’चे 70 कामगार काम बंद आंदोलन करणार आहेत.

या संदर्भातील निवेदन देवदूत कामगारांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनी, महामार्ग पोलीस यांना दिले आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. खालापूर ते किवळे दरम्यान देवदूतच्या सर्व सुविधायुक्त चार गाड्या काम करतात. तिन शिपमध्ये येथे 70 कामगार काम करतात. त्यांना मागील महिन्याचा पगार मिळालेला नाही.

आर्यन कंपनीचा रस्ते विकास महामंडळासोबतचा करार फेब्रुवारी महिन्यात संपला असल्याने आम्ही नेमके कोणाच्या अधिपत्याखाली काम करत आहोत याची माहिती मिळावी, देवदूत टीमला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुरक्षा साधने दिलेली नाहीत, काही दुर्घटना घडल्यास कोणाचाही आरोग्य विमा नाही, टिमची दैनंदिन चहापाणी, राहण्याची व नाष्ट्याची विशेष सुविधा बंद करण्यात आली आहे. कामाची व पगाराची हमी नाही, मागील वर्षापासून पनवेल स्टेशनला लाईटची समस्या निर्माण झाली आहे ती आजुन सुटलेली नाही आदी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.