Lonavala : ‘देवदूत टीम’चे ‘काम बंद’ आंदोलन मागे; कंपनीकडून पगार देण्याचे आश्वासन

Lonavala: Devdoot Team withdraw the 'work stoppage' agitation; Assurance of salary from the company

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आपत्कालीन  सेवा देणार्‍या देवदूत कामगारांना आर्यन कंपनीकडून एप्रिल महिन्याचा पगार देण्यात न आल्याने पगाराच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी देवदूतच्या 70 कर्मचार्‍य‍ांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. आर्यन कंपनीचे संचालक उमेश पाटील यांनी दुपारी कर्मचार्‍यांची भेट घेत दोन दिवसांत पगार देण्याचे आश्वासन तसेच इतर मागण्या मान्य करण्याचा शब्द दिल्यानंतर सदरचे काम बंद आंदोलन मागे घेत कामगारांनी सेवा सुरू केली आहे.

शुक्रवारी देवदूत कर्मचार्‍यांनी पगारासह इतर मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामंडळ, आयआरबी कंपनी, महामार्ग पोलीस यांना दिले होते.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. खालापूर ते किवळे दरम्यान देवदूतच्या सर्व सुविधायुक्त चार गाड्या काम करतात. तीन पाळ्यांमध्ये येथे 70 कामगार काम करतात. त्यांना मागील महिन्याचा पगार मिळालेला नाही.

आर्यन कंपनीचा रस्ते विकास महामंडळासोबतचा करार फेब्रुवारी महिन्यात संपला असल्याने आम्ही नेमके कोणाच्या अधिपत्याखाली काम करत आहोत याची माहिती मिळावी, देवदूत टिमला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुरक्षा साधने दिलेली नाहीत, काही दुर्घटना घडल्यास कोणाचाही आरोग्य विमा नाही, टिमची दैनंदिन चहापाणी, राहण्याची व नाष्ट्याची विशेष सुविधा बंद करण्यात आली आहे.

कामाची व पगाराची हमी नाही याबाबत निवेदन दिले होते. आर्यन कंपनीने कामगारांना दोन दिवसात पगार व कोरोनाचा वाढीव किट देण्यात येणार आहे. काही प्रमाणात कोरोना किट देण्यात आले आहेत, सध्या किटचा तुटवडा असला तरी नवीन किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.