Lonavala – निदान लिगल फोरमच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाळेकर

एमपीसी न्यूज  : सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन करत जनजागृती निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य करणार्‍या निदान लिगल एड फोरम या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र नाळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. वरिष्ठ विधीतज्ञ तनु मेहता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड जाहीर करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांना कायदेविषयक मोफत माहिती देऊन त्यांना साक्षर करण्याचे काम निदान संस्था करत आहे. त्याचसोबत जनतेशी संबंधित धोरणात्मक विषयांचा शासन दरबारी कायदेशीर पाठपुरावा करण्याचे कार्य देखील ही संस्था करत आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याकरिता निदानाचे सदस्य वाहतूक पोलिसांच्या सोबत देखिल काम करत आहेत. या संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी अॅड. निलेश अगरवाल हे सांभाळत असून प्रोजेक्ट समन्वयक म्हणून विजेश कट्टाकुलम, खजिनदार ऍड.मोनाली कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी म्हणून श्रावणी कामत ह्या काम पहात आहेत. या संस्थेच्या नविन सदस्यपदी नुकतीच मयुर पाळेकर यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.