Lonavala : लोणावळा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी देविदास कडू

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी नगरसेवक देविदास कडू यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबतचे पत्र मावळचे प्रांत अधिकारी व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

दोन वर्षापूर्वी लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी भाजपा गटाकडून नगरसेवक भरत हारपुडे यांना गटनेतेपद देण्यात आले होते. तर गटनेते बदलाचे अधिकार मावळचे आमदार बाळा भेगडे यांना देण्यात आले होते. आमदार भेगडे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत हारपुडे यांच्या जागी देविदास कडू यांच्या नावाची गटनेते पदाकरिता जिल्हाधिकार्‍यांकडे शिफारश केली होती. त्याप्रमाणे नवीन गटनेतेपदी देविदास कडू यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.