Lonavala : बाजारपेठत उभारला निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष; मुख्याधिकारी सचिन पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने बाजारपेठत निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातून जाणारी प्रत्येक व्यक्ती आणि वाहनांवर सोडियम हायपोक्लोराईंडची फवारणी स्वंयचलित यंत्राद्वारे होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषद इमारतीसमोर मुख्य रस्त्यावर मंडप तयार करुन त्यामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी कक्ष बनविण्यात आला आहे. याठिकाणी बसविण्यात आलेल्या स्वंयचलित मशिनद्वारे मंडपामध्ये फवारणी होते. याकरिता मशिनमध्ये वेळ सेट करण्यात आली आहे. शहरात येणारी व्यक्ती आणि वाहने यांचे निर्जंतुकीकरण होण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे.

महाराष्ट्रासह मुंबई व पुणे ह्या शेजारच्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा व व्यापक जनकल्याणाचा विचार करुन हे मशिन बसविण्यात आले असून अत्या अत्यावश्यक कामाकरिता बाहेर पडणार्‍या नागरिकांनी या मंडपातून अंगावर सदरचा फवारा घेऊनच पुढे जावे, असे अवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

लोणावळ बाजारपेठेत जयचंद चौक, शिवाजी महाराज चौक, भांगरवाडी व बाजारभागात दोन अशा पाच ठिकाणी हॅन्ड सॅनिटायझर मशिन बसविण्यात येणार आहे. शहरात येणारे नागरिक आणि अत्यावश्यक सेवेतील दुकानदार यांनी या हॅन्ड सॅनिटायझर सेवेचा लाभ घेत स्वतःला निर्जंतुक ठेवावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.