Lonavala : शिवराज्याभिषेक दिनी लोहगड परिसरातील गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Distribution of essential items to the needy in Lohgad area on Shiv Rajyabhishek Day

एमपीसीन्यूज : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, लोहगड विसापूर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्या सहकार्याने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून लोहगड-विसापूर गड परिसरातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिवराज्याभिषेक दिनी लोहगड येथील शिवस्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत लोहगड, मालेवाडी, धालेवाडी, महागाव, मळवली येथील गरीब, गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सोशल डिस्टंसिंगसह सर्व काळजी घेण्यात आली होती. याप्रसंगी गणेश धानिवले, रमेश बैकर, राजू शेळके, शंकर चिव्हे, बाळासाहेब जाधव, अतुल बालघरे, तुकाराम बैकर आदी उपस्थित होते.

हा उपक्रम विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, अमोल गोरे, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर आदी कार्यकर्त्यांनी पार पाडला.

मंचाच्या वतीने गेली २० वर्षे लोहगड विसापूर किल्ल्यांचे गडसंवर्धन व विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केल्यामुळे नागरिकांकडून मंचाचे कौतुक केले जात असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.