Lonavala: कुरवंडे ग्रामपंचायतीला टेम्परेचर गण व ऑक्सिमीटर भेट

कुरवंडे गावात कोरोनाचे तीन रुग्ण मिळून आले आहेत. गावात कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याकरता शिवसेना शाखेकडून हा उपक्रम राबवण्यात आला.

एमपीसी न्यूज- शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा कुरवंडेच्या वतीने कुरवंडे ग्रामपंचायतीला टेम्परेचर गण व ऑक्सिमीटरचे दोन सेट भेट देण्यात आले.

यासह गावात मास्कचे वाटप व इयत्ता बारावीमध्ये डी.पी.मेहता ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान शाखेत 86 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुरवंडे गावातील विद्यार्थीनी अर्पिता गणपत मराठे हिचा सत्कार करण्यात आला.

कुरवंडे गावात कोरोनाचे तीन रुग्ण मिळून आले आहेत. गावात कोरोना आजाराचे संक्रमण वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याकरता कुरवंडे शिवसेना शाखेकडून वरील उपक्रम राबविला असल्याची माहिती जितेंद्र राऊत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.