Lonavala : विकलांग व्यक्तींना कृत्रिम पाय, केलीपर्स आणि व्हीलचेअरचे वाटप

एमपीसी न्यूज – संपर्क बालग्राम संस्था, रुचिका क्लब मुंबई व भगवान महावीर विकलांग सहायता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क बालग्राम मळवली येथे तीन दिवसीय वैद्यकीय शिबिर आयोजित केले आहे. याठिकाणी विकलांग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय केलीपर्स व व्हीलचेअर वाटप करण्यात येत असून सोबत कान, नाक, घसा तपासणी उपचार तसेच कानाची मशीन मोफत दिली जाणार आहे.यात कान, नाक, घसा तपासणीचा 423 रुग्णांनी लाभ घेतला तर 264 रुग्णांना मोफत व्हीलचेअर व केलीपर्स आदी 450 वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बापू पाटील, संपर्कचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, लोहगडचे सरपंच नागेश मरगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पोलिस पाटील सचिन भोर्डे, सामाजिक कार्यकर्ते गणेश धाणीवले, भाजे गावाचे उपसरपंच दिलीप भालेराव, सदस्य गणेश ढगे, भरत भरणे, रुचिका क्लब च्या सुमित्रा श्रॉफ शोभा झुनझुनवाला, चंदा जिवराजका, अल्का संघवी, ज्योती जालान, भगवान विकलांग सहायता समितीचे डॉ व्यास, डॉ प्रकाश गोलेछा, कानन गोलेछा, संपर्कचे कार्यकारी अधिकारी अनुज सिंग, सतीश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक अमितकुमार बॅनर्जी यानी केले. तर सूत्रसंचालन संपर्कचे जनसंपर्क अधीकारी प्रदीप वाडेकर यानी केले. संपर्क संस्था व रुचिका क्लबमुळे मावळ तालुक्यातील अनेक विकलांग व्यक्तींना कृत्रिम पाय केलीपर्स व व्हीलचेअरचा लाभ मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.