Lonavala : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

एमपीसी न्यूज : रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या (Lonavala) वतीने माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त  लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या 75 विद्यार्थ्यांना वही – पेन व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मानकर यांनी पुष्पहार अर्पण केले.

संस्थेच्या लोणावळा शहरप्रमुख प्रणाली कावरे यांनी आजच्या जिजाऊंच्या लेकींनी तलवार रुपी वही व पेन हाती घेऊन शैक्षणिक क्रांती केली पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आशा मानकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करत, शिकणाऱ्या गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन प्रोत्साहित करणे हे खरे महापुरुषांना अभिवादन आहे व हे काम रयत विद्यार्थी विचार मंच करत आहे असे मत व्यक्त केले.

Chinchwad News :  लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी 1 कोटी 60 लाखांची मदत

तसेच, शाळेची विद्यार्थिनी श्रेया शिंदे हिने (Lonavala) जिजाऊंच्या वेशात ‘मी जिजाऊ बोलतेय’ ही एकांकिका सादर केली. मावळ महासचिव प्रा. विक्रांत शेळके यांनी ‘शिक्षण, माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन केले.

यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, महाराष्ट्र सहसचिव भाग्यश्री आखाडे, लोणावळा शहराध्यक्ष प्रणाली कावरे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल वाघमारे, मावळ महासचिव विक्रांत शेळके, शाळेचे शिक्षक महादेव शेलार, नितीन बोंगळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.