Lonavala : शहरातील शाळा व महाविद्यालय सुरु करण्याची घाई करु नका : शिवसेना

Don't rush to start schools and colleges because of Corona: Shiv Sena

एमपीसीन्यूज : राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणावळा शहरातील शाळा सुरु करू नये तसेच शालेय फी साठी विद्यार्थी व पालकांवर सक्ती करू नये, अशी मागणी लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात कोरोनामुळे राज्यातील सर्व ठिकाणी लाॅकडाउन वाढविण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार ठप्प झाल्याने सर्वांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु केल्या तर सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल.

सध्या सर्व शाळांनी ऑनलाइन अभ्यास चालू केला आहे. शहरातील काही शाळेतून विद्यार्थ्यांना व पालकांना शालेय फी साठी वांरवार मागणीही केली जात आहे. याकरिता शिवसेना लोणावळा शहराच्यावतीने शहरातील सर्व विद्यालय व महाविद्यालयाना आज शाळा लवकर सुरू करू नये व शालेय फी साठी मागणी करु नये, अशी शिवसेनेची मागणी आहे.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बहुतांश शाळेतील मुख्याध्यापकांशी याविषयावर चर्चा करून त्यांना निवेदन दिले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापकांनी फी सवलती साठी सर्व पालकांना योग्य सहकार्य करण्याचे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आश्वासन दिल्याचे शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांनी सांगितले.

शिवसेना समन्वयक जयवंत दळवी, युवासेना मावळ समन्वयक शाम सुतार, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, विद्यार्थी सेना शहर संघटक दत्ता थोरवे, शाखा प्रमुख संजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.