Lonavala : रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीकरिता चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज- रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती शाळकरी मुलांना व्हावी याकरिता वाकसई ग्रामपंचायतीच्या सहयोगाने शरयु टोयाटोच्या वतीने वाकसई भागातील जिल्हा परिषद शाळा व देशमुख विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्ते अपघातासंदर्भात चित्र रेखाटत नागरिकांना रस्ते सुरक्षेबाबत संदेश दिला. टोयाटोच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता आवश्यक असलेले पेपर तसेच रंग पुरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली.

यावेळी वाकसई ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक काशीकर, उपसरपंच मनोज जगताप, ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख, महेंद्र शिंदे, अनिता रोकडे, पूनम येवले, उषा देशमुख, कैलास काशीकर, निलम शेलार, राजु खांडेभरड, टोयाटोचे राजु शेलार, ग्रामस्त महेंद्र शिर्के यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. शालेय जिवनापासून मुलांना रहदारीचे नियम व सुरक्षा उपाययोजनांची माहिती झाल्यास त्याचा चांगला परिणाम येणार्‍या भविष्यकाळात पहायला मिळेल तसेच नागरिकांनी देखील वाहन चालवितांना नियमांचे पालन करावे असे प्रतिपादन उपसरपंच मनोज जगताप यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.