Lonavala : पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जवानांचा सत्कार

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करत गंभीर गुन्ह्यांची तातडीने उकल करत पोलीस दलाचे नाव उंचावणार्‍या लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस जवानांचा सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त या सर्व जवानांना वरिष्ठ अधिकार्‍यांनी कौतुकाची थाप दिली.

सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, प्रियंका माने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

लोणावळा शहरात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा केलेला खून, एका महिलेवर तिच्या नवर्‍याने केलेला खुनी हल्ला, अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, घरात नाराज होऊन निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुली यांचा शोध हे सर्व गुन्हे लोणावळा शहर पोलिसांनी टिमवर्कच्या माध्यमातून तातडीने उघडकीस आणत अनेक अनर्थ टाळले आहेत. या सर्व कामगिरीमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा नवनीत काँवतयांनी सन्मान केला.

यावेळी बोलताना काँवत म्हणाले, ” पोलिसांकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. आपण खाकी वर्दीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो, पोलीस म्हणून आपल्याला संविधानाने अनेक अधिकार प्रदान केलेले आहेत, त्याचा वापर करुन जनतेची व देशाची सेवा करणे हे आपले व्रत आहे. देशाच्या सुरक्षेकरिता जे जे गरजेचे आहे ते सर्व जवान म्हणून आपण कर्तव्य भावनेने करावे” असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.