Lonavala : वाहतूक पोलिसांना अरेरावी करणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलिसांबरोबर अरेरावीचे आणि उद्धटपणाचे वर्तन करीत शिवीगाळ करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मद्यप्राशन करून ट्रिपल शीट वाहन चालविणाऱ्या चालकाची ब्रेथ अँनालायजर मशिनद्वारे तपासणी करीत असताना त्यास नकार देत पाच जणांनी वाहतूक पोलीस चौकीत मोठा गोंधळ घातला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी लोणावळा शहर वाहतूक पोलीस कुमार रिसॉर्ट चौकात वाहनांची तपासणी करीत असताना वरील प्रकार घडला. दुचाकी चालक रघुनाथ किसन टाकवे (वय-५०, रा.भांगरवाडी, लोणावळा) हा आपल्या दुचाकी वरून (MH/14/HH/1366) मद्य सेवन करुन मद्य सेवन केलेले इतर दोन साथीदार शंकर धायु हिरवे (वय-२४ रा.देवघर ता.मुळशी) आणि किरण बाबासाहेब आढाव (वय-१९, रा.रामनगर, लोणावळा) यांना ट्रीपल सीट घेऊन जात असताना वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले.

  • दरम्यान, या तिघांना सोडवण्यासाठी तेथे आलेल्या विजय गंगाराम आखाडे (वय-३९) आणि संतोष शंकर आखाडे (वय-२३, दोघे रा.रामनगर लोणावळा) यांनी सर्वानी मिळुन दुचाकीचालक रघुनाथ टाकवे याच्या ब्रेथ अँनालायजर मशिनद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणीला विरोध करीत दंगा करून मोठा गोंधळ घातला. तसेच कामगिरीवर असणाऱ्या वाहतूक पोलीसांकडे पहात सर्वांना शिवीगाळ केली. सोबतच तुम्ही आम्हाला ओळखत नाही काय, तुमचेकडे बघून घेतो. तुमची वरीष्ठांकडे तक्रार करतो, तुमच्या नोकऱ्याच घालवतो, आशा प्रकारे दमदाटी केली.

पोलीस कॉस्टेबल चंद्रकांत सुभाष गव्हाणे यांच्या फिर्यादीनुसार शासकीय कर्तव्य करणेस अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून लोणावळा पोलिसांकडून वरील पाचही जणांच्या विरोधात भादवि कलम १४३, १४७, १४९, ३५३, मुंबई वाहतूक कायदा १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उप निरिक्षक बी.एस.सांगळे हे करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.