BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : चित्रपट निर्माते मनसुखलाल गुगळे यांचे निधन

224
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- चित्रपट निर्माते, वितरक व ज्येष्ठ व्यावसायिक मनसुखलाल आनंदराम गुगळे (वय 81) यांचे काल, शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लोणावळा येथील कैलाश स्मशानभूमीत आज शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुगळे यांनी परिवार, विश्वास आणि जहाँ प्यार मिले या चित्रपटांची निर्मिती केली. अनेक चित्रपटांना त्यांनी वित्तपुरवठाही केला तर काही काळ चित्रपट वितरक म्हणूनही ते कार्यरत होते.

मुळचे अहमदनगरचे असलेले गुगळे चित्रपट व्यवसायातील अपयशा नंतर लोणावळ्यात स्थायिक झाले. येथे त्यांनी ज्यूटच्या लेडिज पर्स आणि प्रवासी बँगांचे उत्पादन सुरू केले. लोणावळ्यात तयार होणाऱ्या पर्स व बँगा ते मुंबईत नेऊन विकत. पुढे हाच त्यांचा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय झाला. त्यांच्या मागे पत्नी कमला, विवाहित कन्या हेमा, मुलगा अशोक व राजेश आणि नातवंडे असा परिवार आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.