Lonavala : वरसोली टोलनाक्याजवळ ट्रकला आग; चालकाचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : लोणावळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर वरसोली गावाच्या हद्दीत टोलनाक्याजवळ कंटेनर आणि ट्रकच्या अपघातात ट्रकच्या केबीनने पेट घेतला. त्यामुळे लागलेल्या आगीत होरपळून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने व्हाईट सिमेंटची पोती घेउन जाणारा ट्रक (एमएच 14, जीयु 9570) समोर असणार्‍या कंटेनरला वेगात धडकला. त्यात ट्रक चालक सुनिल संजय हनवते (वय 30, रा. तळेगाव दाभाडे) हा आडकला. त्यानंतर काही क्षणातच ट्रकच्या केबीनने पेट घेतला. या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला.

लोणावळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशिष जाधव पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.