BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : ओव्हरहेड ग्रँटी बसविण्याकरिता द्रुतगती मार्गाची मुंबई लेन दोन तास बंद

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड ग्रँटी बसविण्याकरिता या मार्गावरील मुंबई लेन दोन तास बंद ठेवण्यात आली होती. दुपारी बारा ते दोन दरम्यान हे काम करण्यात आले. या दरम्यान सर्व वाहतूक किवळे येथून राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती.

आज गुरुवारी दुपारी बारा ते दोनच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन किलोमीटर क्रमांक 65/500 येथील ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

  • त्या दरम्यान, सर्व प्रकारच्या अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक 66 या ठिकाणी थांबविण्यात आली होती. तर हलकी चारचाकी वाहने व इतर प्रवाशी वाहन द्रुतगती मार्ग किवळे ब्रिज येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविण्यात आली होती. द्रुतगती मार्ग काही काळ बंद र‍ाहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.