BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : वन नेशन कप नेटबॉल स्पर्धेत सलग तिसर्‍या वर्षी संपर्कचा संघ विजयी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या वन नेशन नेटबॉल कप या 16 वर्षाखालील नेटबॉल स्पर्धेत विजेतेपद सलग तिसर्‍यांदा संपर्क बालग्राम संस्थेच्या भाबर्डे या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कायम राखले आहे. संपर्कच्या या मुलांचे विशेष कौतुक नाझ इंडिया फाउंडेशनने तसेच संपर्क संस्थेचे संस्थपक अमितकुमार बॅनर्जी यांनी केले आहे.

वन नेशन नेटबॉल कप ही स्पर्धा मुंबई येथे संपन्न झाली. यात दहा राज्यातील संघांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातून ठाणे, मुंबई आणि संपर्क पुणे या संघांना आमंत्रित करण्यात आले होते. यात शेवटचा सामना दिल्ली आणि संपर्क संस्था पुणे यात झाला. यात मोठी आघाडी घेत संपर्क विद्यालयाच्या संघांनी विजय मिळवला.

  • संघ नायक ओंकार कुंभार, धुला बावधाने, अक्षय पवार, अनिल मरगले, प्रेमराज हुंबे, समाधान मरगले, वंदना मेने, एकता धावरे, अनिशा कोकरे, आकांक्षा वाशिवले यांनी खेळाच्या सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवत विजयावर नाव कोरले.

सलग तिसर्‍या वर्षी संपर्कने हा कप जिंकला आहे. त्यांना प्रशिक्षक सोमनाथ बिश्वास, टिम समन्वयक विद्या बोभाडे, प्रदीप वाडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

HB_POST_END_FTR-A2

.