Lonavala : शहरात एकाच कुटुंबातील चौघे कोरोना पॉझिटिव्ह

Lonavala Corona Update four corona Positive in same Family

एमपीसीन्यूज : जुना बाजार येथील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना तपासणी अहवाल आज, गुरुवारी पाॅझिटिव्ह आला. यामध्ये पती, पत्नी व दोन मुले यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

तर बुधवारी तपासणीसाठी पाठविलेले 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, ही शहरवासियांकरिता दिलासादायक बातमी आहे.

आज अखेर लोणावळ्यात कोरोनाचे 44 रुग्ण झाले असून यापैकी 28 जण अँक्टिव रुग्ण असून 13 जण बरे झाले आहेत. 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोणावळा शहरात तपासणी करण्यात आलेल्या एकूण नागरिकांपैकी 112 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 44 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. सात जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

लोणावळा शहरात विभागवार वर्गवारी केली असता भांगरवाडीत सर्वांधिक 11 रुग्ण मिळून आले आहेत. त्या खालोखाल गावठाण विभागात सात, नांगरगावात सहा, खंडाळा पाच, जुना खंडाळा चार, पांगोळी चार, गवळीवाडा तीन, वलवण दोन, पोर्टर चाळ व वर्धामान सोसायटीमध्ये प्रत्येकी एक असे 44 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

यापैकी भांगरवाडी विभागातील चार जण बरे झाले आहेत. तर नांगरगाव विभागातील सर्व सहा रुग्ण बरे झाले आहेत.

यासह खंडाळ्यातील दोन व गवळीवाड्यातील एकजण बरे झाले आहेत. गवळीवाडा, वलवण व पोर्टर चाळ येथील प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोणावळा सध्या लाॅकडाऊन सुरू आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घरातच थांबावे व कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.