Lonavala : शहर, परिसरात आज चार जण कोरोना पॉझिटिव्ह

शहरातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 90 झाली : Four corona positive today in the city, area

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात मिळून आज चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 90 झाली आहे.

याबाबत लोणावळा नगरपरिषदेने दिलेल्या माहितीनुसार झालावाडी येथील कोव्हिड केंद्रातून बुधवारी 9 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.

त्यापैकी तीन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यातील दोन जण लोणावळा शहरातील असून एक जण देवघर येथील आहे.

लोणावळा शहरातील हुडको येथील एका 55 वर्षीय महिला, भांगरवाडी येथील एका 71 वर्षीय पुरुष व तुंगार्ली बद्री विशाल सोसायटीमधील एक 38 वर्षीय तरुण या तिघांचा कोरोना चाचणी अहवाल आज गुरुवारी पॉझिटिव्ह आला.

तर ग्रामीणमधील देवघर येथील एका 29 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गुरुवारी आढळलेल्या रुग्णामुळे लोणावळा शहरातील एकूण रुग्णसंख्या 90 झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.