Lonavala fraud : कंपनी मालकाची फसवणूक; बनावट सोन्याच्या विटा, हिरे देत घातला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज : बनावट सोन्याच्या विटा व डायमंड खरे असल्याचे भासवून मोठ्या कंपनीच्या मालकाची फसवणूक करुन 10 लाखांचा गंडा घालणाऱ्या, टोळीच्या म्होरक्यास गुन्हे शाखेकडुन (Lonavala fraud) जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी समद हमीद मकानी वय 53 वर्षे, रा. मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी भिमा गुलशन सोळंकी रा. बडोदा गुजरात सध्या रा. देहूरोड पुणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात भा.द.वि.कलम 406, 417, 419, 420, 504, 506, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहे.

 

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत मुंबई येथील राहणारा समद हमीद मकानी वय 53 वर्षे धंदा सॉफ्टवेअर कंपनीचा मालक यास काही दिवसापूर्वी आरोपीने ओळख करूण घेवून मी जे.सी.पी.ने कर्नाटक, बेंगलोर या ठिकाणी जुने घर पाडण्याचे काम करीत असताना मला त्या घरा मध्ये सोन्याच्या विटा व डायमंडची पिशवी मिळून आली आहे. ते मिळालेले सोने विक्री करण्यासाठी मला मदत करा.(Lonavala fraud) मला खूप अडचण आहे, मला सध्या 10 लाख रुपये दया वगैरे अमीष दाखवून. फीर्यादी यास सोन्याची विट व बनावट डायमंड देवून फसवणूक केली वगैरे मजकूराची फिर्याद दिनांक 22 सप्टेंबरला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

Nigdi : मातृमंदीर विश्वस्त संस्थेच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद

 

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण  पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथका मार्फत करीत असताना 27 सप्टेंबरला  गुन्ह्यातील संशयित आरोपी बाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास करण्यात आला.(Lonavla fraud)  त्यानी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी भिमा गुलशन सोळंकी रा. बडोदा गुजरात सध्या रा. देहूरोड पुणे यास वैद्यकीय तपासणी करून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.

पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत. तसेच आणखीन काही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जनतेला केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,(Lonavala fraud) डॉ. अभिनव देशमुख,  अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश गटटे,  उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. ढोले पाटील यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि सुनिल माने, सपोनि नेताजी गंधारे , सपोनि सचिन रावळ, पो.स.ई. प्रदीप चौधरी, सहा.फौजदार प्रकाश वाघमारे, सहा. फौजदार हनुमंत पासलकर, सहा.फौजदार युवराज बनसोडे, पोहवा राजु मोमीन, पोना बाळासाहेब खडके, पोना शरद जाधवर, पोकॉ धिरज जाधव, पोकॉ प्राण येवले, मपोना मनिषा डमरे, चापोकॉ दगडू विरकर व पोकॉ मच्छिंद्र पानसरे यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.