Lonavala: कोरोना योध्दांना होमिओपॅथी गोळ्याचे मोफत वाटप

Lonavala: Free distribution of homeopathic pills to Corona warriors

एमपीसी न्यूज – कोरोना विरुध्दच्या लढ्यात रात्रंदिवस काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता त्यांना ‘कॅम्फर 1 एम’ ह्या होमिओपॅथी गोळ्याचे लोणावळ्यात मोफत वाटप सुरू करण्यात आले आहे. सोबतच नागरिकांना देखिल ह्या गोळ्या वाटप करण्यात आल्या आहेत.

कोरोना आजारासह इतर कोणत्याही आजारापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता आयुष मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे लोणावळ्यात होमिओपॅथी क्षेत्रातील डाॅ. कांचन गोरे व डाॅ. गार्गी यांनी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौहान, रमेश पाळेकर, धवल चौहान सोशल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सदरच्या होमिओपॅथी गोळ्या मोफत वाटप उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना या महामारीच्या रोगावर आज अखेर कोणतीही लस उपलब्ध झालेली नसल्याने नागरिकांच्या मनात ह्या आजाराविषयी प्रचंड भिती निर्माण झाली आहे.,शासनस्तरावरून कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता लाॅकडाऊनसह विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी नागरिकांनी सदरच्या आजारापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. आयुष मंत्रालयाने याकरिता आयुर्वेदिक व होमिओपॅथी थेरपीचा आधार घेण्यास मान्यता दिली आहे. होमिओपॅथी थेरपीमध्ये ज्या तीन गोळ्या सुचविण्यात आल्या आहेत त्यामध्ये ‘कॅम्फर 1 एम’ हिचा देखिल समावेश आहे. ह्या गोळ्यांमुळे शारिरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता मदत होत असल्याने कोरोना योद्ध्यांना ह्या गोळ्याने मोठी मदत मिळेल असे मत डाॅ. गोरे व डाॅ. गार्गी यांनी व्यक्त केले. लोणावळा नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांना देखिल ह्या गोळ्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.