Lonavala : बालकांकरिता मोफत व अल्पदरात हृदय शस्त्रक्रिया शिबिर

एमपीसी न्यूज- इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 बी 2, हृदयमित्र संस्था लायन्स क्लब लोणावळा व मॅग्नम हेल्थकेअर सोल्युशन आणि आईस्टर अँन्ड पर्ल हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 9 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मोफत तसेच अल्पदरात हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

1 ते 15 वयोगटातील रुग्णांची तपासणी 4 फेब्रुवारी रोजी मॅग्नम हेल्थकेअर सोल्युशन आणि आईस्टर अँन्ड पर्ल टुलिप हॉस्पिटल गणेश खिंड रोड पुणे येथे करण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी 9 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. रमेश शहा, लोणावळा येथील बालरोगतज्ञ व हृदयमित्र संस्थेचे चेअरमन डॉक्टर हिरालाल खंडेलवाल, लोणावळा लायन्स क्लबचे अध्यक्ष अविनाश गांधी यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.