Lonavala : मित्रावर गोळीबार करुन फरार झालेला आरोपी 24 तासात जेरबंद

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरुन जिवाभावाच्या मित्रावर गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलीसांनी 24 तासाच्या आत शोध घेत जेरबंद केले. लोणावळ्याजवळील वेहेरगाव याठिकाणी सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गोळीबारीची ही घटना घडली होती.

सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंथन अशोक सातकर, हर्षद बाळासाहेब वाघमारे, समिर सुरेश शिरसठ (रा. नांगरगाव) व दिनेश शिंदे (रा. कामशेत, मावळ) हे चौघे मित्र मंथन यांचे मामा चंद्रकांत देवकर यांच्या देखरेखेखाली असलेला दहिवली वेहरेगाव येथील तुरे बंगल्यावर गेले होते. रात्री नऊच्या सुमारास जेवण करुन तिसर्‍या मजल्यावरील खोलीत आराम करत असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मंथन व दिनेश शिंदे यांच्यात काहीतरी कारणावरुन वाद झाला.

  • यावेळी मंथन हा दरवाजाकडे जात असताना दिनेश यांने त्याच्याकडील पिस्तूलमधून मंथनवर प्राणघातक हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न गेला. यावेळी गोळी मंथनच्या डाव्या हाताच्या खांद्यावर लागली. घटनेनंतर दिनेश शिंदे याने घटनास्थळावरुन पळ काढला.

या घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, कामशेतचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील हे दिवसभर या प्रकरणाचा आढावा घेतला. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फरार शिंदेला अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like